• Phone number: +91 9822282766

Background

शुभस्य शीघ्रम
समाजात अनेक स्त्रिया विविध प्रकारची आव्हानं पेलत असतात. नोकरी, व्यवसाय ,घर, मुल आणि घरातल्या वयस्कर लोकांच्या जबाबदाऱ्या पेलून मनात कुठेतरी काहीतरी बनण्याची त्यांची उर्मी आपण बघतो. कधी कधी परिस्थिती त्यांना व्यवसाय करून पोटाची खळगी भरायला शिकवते. कित्येक स्त्रियाना बाहेरच्या जगात अत्यंत बिकट परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो. हे आपण सगकेच बघत असतो. त्यामुळे स्त्रियाना सक्षम बनवण्याची इच्छा 'घे भरारी' मार्फत पूर्ण करण्याचा आमचा विचार पक्का झाला. तसंच आज कितीही उच्चंशिक्षित व्यक्ती असली तरीही नोकरी मिळणं दुरापास्त झालं आहे. त्यामुळे तरुण मुलांनी व्यवसायात येऊन नोकरी करणारे नाही तर देणारे व्हावे ही इच्छा घे भरारी तुन पूर्ण व्हावी हा आमचा मानस होता आणि यातूनच घे भरारी या प्रदर्शनाचे सुरुवात झाली

करोनाचं वळण
जानेवारीच्या यशस्वी प्रदर्शनानंतर एप्रिल मध्ये मुलांचं प्रदर्शन होतं. सगळी तयारी झालीच होती की करोनानी घातच केला. सगळं काही रद्द झालं. घेभरारी चं प्रचंड नुकसान झालं . परंतु आमच्या या नव्व्यावसायिक आणि यातल्या स्त्रियांचं तर अफाटच नुकसान झालं लाखोंचा माल त्यांच्या घरात पडून होता. अशा वेळी त्यांना निराशेतून बाहेर आणण्यासाठी घे भरारी फेसबुक ग्रुप ची स्थापना केली. आणि ग्रुप मध्ये विविध उपक्रम राबवून ग्रुप संख्या वाढवण्यावर भर दिला.



About us

राहुल कुलकर्णी
को-फाउंडर घे भरारी

लहान वयापासूनच व्यवसाय करण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा असणारं हे व्यक्तीमत्व कल्पकता आणि चिकाटी यांचा अनोखा संगम आहे. अनेक नव्या कल्पना, समाजसेवेची आवड, अत्यंत सकारात्मक आणि नम्र स्वभाव ही यांची वैशिष्ट्ये.
घरी कोणतीही व्यावसायिक बॅकग्राऊंड नसताना आणि कोणतेही भांडवल उपलब्ध नसताना व्यावसायिक होणे हे जिकिरीचे काम यांनी शिवधनुष्य म्हणून पेलले.
अनेक समस्या, व्यवसायात सतत चढउतार, घरातील आणि सरकारी पातळीवरील आव्हाने यांचा सलग सामना केला. त्यातुन येणाऱ्या अनंत समस्या आणि त्यावर उपाय काढताना येणारे नैराश्य इतर नवव्यासायिकांना सोसावे लागू नये अश्या भावनेने त्यांनी घे भरारी ह्या व्यावसायिक समूहाची स्थापना केली.
लक्ष्मी रोड वर आबाचा ढाबा हे छोटेखानी रेस्टॉरंटचे राहुल कुलकर्णी यांचेच!!
नॉनव्हेज जेवण हे येथील वैशिष्ट्य.
पुण्यामध्ये आबाचा ढाबा माहीत नाही असं कोणी आढळत नाही.
यातूनच ब्रँडिंग चे महत्व किती आहे हे ते आवर्जून सांगतात.
घे भरारी मधील ऑनलाइन आणि ऑफलाईन व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन आणि व्यावसायिकाला व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते त्याचा ब्रँड निर्माण करण्यासाठी लागणारी प्रत्येक मदत व्हावी हेच घे भरारीचे अंतिम उद्दिष्ट आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात घे भरारीची प्रदर्शने व्हावी ही त्यांची मनीषा आहे.
घे भरारी ह्या व्यावसायिकांनी तयार केलेल्या फेसबूक ग्रुप वर 150000 पेक्षा जास्त मेम्बर असून त्यावर जाहिरात करणे संपूर्णपणे मोफत आहे.

संपर्क : ९८२२२८२७६६

नीलम उमराणी एदलाबादकर
को-फाउंडर घे भरारी

शिक्षकी पेशात रमलेल्या नीलम यांना मुलांच्या संगोपनासाठी ब्रेक घ्यावा लागला आणि तोही थोडा थोडका नाहीतर 8 वर्षे!!! परंतु घरी राहणे हे स्वभावातच नसल्याने बालमित्र राहुल कुलकर्णी यांच्याबरोबरीने घे भरारी ऑनलाइन आणि ऑफलाईन समूहाची निर्मिती केली.
छोट्या घरातून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला मदत झाली पाहिजे हे त्यांचे ध्येय आहे.
अत्यंत कणखर,सकारात्मक, ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता आणि व्यावहारिक दृष्टिकोन ही यांची वैशिष्ट्ये आहेत.
स्त्रियांनी आपली स्वप्ने आणि व्यावसायिक जिद्द सोडू नये हे त्या कळकळीने सांगतात.
स्त्रियांचा गृहिणी ते व्यावसायिक हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घे भरारी फेसबुक ग्रुप सर्वतोपरी मदत करत असतो.
यासाठी स्त्रियांना वेळेचे व्यवस्थापन, मार्केटिंग चे महत्व, स्वतःकडे आणि स्वतःच्या व्यवसायाकडे पहाण्याचा दृष्टिकोन, प्रेझेन्टेशन इत्यादी वर्कशॉप या ग्रुप तर्फे घेतली जातात.
घे भरारी तर्फे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक येथे प्रदर्शने आयोजित करण्यात येतात.
अत्यंत उच्च दर्जाच्या हाताने बनवलेल्या अप्रतिम वस्तू हे घे भरारीचं वैशिष्ट्य आहे हे त्या आवर्जून नमूद करतात.