• Phone number: +91 9822282766
Guinness Video Album

नमस्कार

"घे भरारी" हे नवउद्योजक स्त्री आणि पुरुषांसाठीचे हक्काचे व्यासपीठ आहे.

घे भरारी ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे कार्यरत आहे.आज ह्या ग्रुप मध्ये असणाऱ्या एक लाख 40 हजारहुन अधिक उद्योजकांमध्ये महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून जवळपास 70 टक्के स्त्रिया आहेत. घरून काम करणाऱ्या आणि अनेक अडथळे आणि संकटाचा सामना करून स्वतःचा एक ठसा उमटवणाऱ्या असंख्य स्त्रिया ही आमची खरी शक्ती ,ऊर्जा आणि ताकद आहे. महामारीच्या भयावह काळात अनेक पुरुषांच्या नोकऱ्या गेल्यानंतर अनेक स्त्रीयांनी त्यांची घरे घे भरारी मार्फत ऑनलाइन आणि ऑफलाईन व्यवसाय करून सावरली हे घे भरारीचे यश म्हणावे लागेल. या मध्ये पापड लोणची करणारी एक छोटी बचत गटातील महिला ते अत्यंत कुशल विणकाम करणारी , आणि अनेक अप्रतिम उत्पादने बनवणारी अश्या अनेक महिलांचा समावेश आहे. दर महिन्याला 150 पेक्षा जास्त फेसबुक live आणि प्रत्यक्ष 100 हुन जास्त स्टॉल असलेली प्रदर्शने ही घे भरारी ची खासियत आणि ताकद. कधी केवळ स्वतःच्या बळावर ,कुणाचीही मदत नसताना, किंवा असंख्य जबाबदाऱ्या हाताळणाऱ्या या असंख्य महिलांना उत्तम सोशल मीडियाबद्दल ज्ञान देऊन ऑनलाईन व्यावसायिक बनवण्यात घे भरारी अग्रेसर ठरले आहे. कोणत्याही घरून काम करणाऱ्या स्त्री साठी किंवा नवीन कल्पना घडून येणारे तरुण उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी घे भरारी काम करण्यास उत्सुक आहे.

"ghebharari19" ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा

1,40,000+

उद्योजक

120+

प्रदर्शने

30+

फेसबुक live

Team

Testimonials